श्री अर्जुनेश्वर क्षारपड सेवा संस्थेकडून गणपतरावं पाटील यांचा सत्कार
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
अर्जुनवाड ( ता. शिरोळ) येथील श्री अर्जुनेश्वर क्षारपड सेवा संस्था अर्जुनवाड यांच्या कडून शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिन सुधारणा करण्यासाठी उपयुक्त योगदान आणि अर्जुनवाड साठी विशेष प्रयत्नातून शासनाकडून हेक्टरी 60 हजार रुपये, पहिला हप्ता 51 लाख रुपये अनुदान मंजूर केल्याबद्दल गणपतरावदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री अर्जुनेश्वर क्षारपड सेवा संस्थेचे चेरमन विलास ईश्वर पाटील, व्हाईस चेअरमन सुरेश विद्याधर चौगुले, हनुमान सेवा सोसायटीचे चेरमन प्रदीप चौगुले, नंदकुमार पाटील, चंद्रकांत गंगधर, विजय सूर्यवंशी, किरण महाडिक, प्रमोद पाटील आदी सर्व संस्थेचे संचालक मंडळ, शेतकरी वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा