दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन जयसिंगपूरातील सहा जण ठार



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन एकाच कुटुंबातील सहाजण ठार; तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना रविवारी मोहोळ तालुक्यातील पंढरपूर पालखी मार्गावर घडली.

अपघातग्रस्त मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे रहिवासी आहेत. इरफान नुरखाँ खान (40), बेनझीर इरफान खान (37), मुजाहिद इमाम आतार (37), डॉ. आफरीन मुजाहिद आतार (30), इनाया इरफान खान (2), अराफत मुजाहिद आतार (10, सर्व रा. मोहोळ, मूळ जयसिंगपूर) अशी मृतांची नावे आहेत.

अरहान इरफान खान (10, रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी (35), मनीषा मोहन हुंडेकरी (30, दोघे रा. गादेगाव, ता. पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत. खान (आतार) हे कुटुंब वैद्यकीय क्षेत्रात कामानिमित्त सात वर्षांपूर्वी जयसिंगपुरातून मोहोळ तालुक्यात स्थायिक झाले होते. दरम्यान, या अपघाताची घटना समजताच जयसिंगपूर परिसरात शोककळा पसरली आहे. शाहूनगर भागातील चांदतारा मजिदजवळ यांचे कुटुंब व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

मोहोळ येथील खान-आतार कुटुंबीय उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी येथे गेले होते. रविवारी ते मोटारीरने (एमएच 13 डीटी 8701) मोहोळकडे परतत होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांची मोटार पेनूर गावाच्या शिवारातील माळी पाटी परिसरात आली असताना मोहोळहून पंढरपूरकडे भरधाव वेगात निघालेल्या मोटारीने (एमएच 13 डीई 1242) त्यांच्या मोटारीला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष