धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी जनरेटा उभारणार : रामचंद्र डांगे
नृसिंहवाडी येथे धनगर समाजाचा मेळावा संपन्न
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन आजपर्यंत राजकीय पक्षांनी समाजाचा वापर केला आहे.समाजात दुफळी निर्माण करायची सत्तेची पोळी भाजायची गरज संपल्यावर समाजाला वाऱ्यावर सोडायच काम राजकर्त्यांनी केलं आहे.हे आम्ही एकसंघ नसल्याने त्यांना शक्य झालं समाजाच्या उत्कर्षासाठी समस्त धनगर समाजाला एकत्रित करून जनरेटा उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले.
नृसिहवाडी ता.शिरोळ येथील संजय सांस्कृतिक हॉल येथे आज शनिवारी सकाळी 11 वाजता शिरोळ तालुका धनगर समाजाच्या बोलविण्यात आलेल्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष डांगे बोलत होते.डॉ.दशरथ काळे,वसंत हजारे,बाबासाहेब सावगावे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना हजारे म्हणाले धनगर समाजात शिक्षणाची जागृती होऊ लागली आहे.समाजत शिकून सुशिक्षित बेरोजगार निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोणातून त्यांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी चळवळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे.यासाठी समाजबांधवांनी पेटून उठण्याची गरज आहे.
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.समाजातील विविध पदावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.स्वागत राविकुमार पाटील प्रास्ताविक डॉ.काळे यांनी केले.डॉ.दिशा काळे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
प्रा.बि.डी सावगावे, आप्पासाहेब बंडगर, सावगावे, चंद्रकांत जोंग,संजय अनुसे,वसंत हजारे,माधुरी सावगावे, मनीषा डांगे आदींनी आपल्या मनोगतातून समाजातील मुला-मुलींचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि आरक्षणासंदर्भात तीव्र लढा उभा करण्याच्यादृष्टींने समाजप्रमुखांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे सांगितले.
यावेळी उमेश कर्णाळे,गणपतराव गावडे, आण्णासाहेब जोंग, आप्पासाहेब बंडगर, मल्लू खोत, प्रभाकर बंडगर, तानाजी आलासे, रघु नाईक, संजय पुजारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा