मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ कुरुंदवाड कडकडीत बंद

प्रतिकात्मक पुतळा दहन करुन सर्व पक्षीय कृती समिती आक्रमक 

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क

   कोरोनाने मृत झालेल्या आईचे अनुदान आणि त्या जागेवर वारसदार म्हणून बहिणीला नोकरी देण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी 10 लाखाची मागणी करत कर्मचारी व ठेकेदाराकरवी 8 लाख रुपये स्वीकारले. उर्वरित 2 लाख रुपये देण्यासाठी अपमानस्पद वागणूक दिल्याने वाघेला कुटुंबीयांनी सामुदायिक इच्छामरणाला परवानगी मागितली होती. या अन्यायाविरुद्ध सर्व पक्षीय बचाव कृती समितीतर्फे आज सोमवारी कुरुंदवाड बंद पुकारण्यात आले होते. व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते. दरम्यान सपोनि बालाजी भांगे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

   सकाळी पालिका चौकातुन मोर्चाला सुरवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा पालिका चौकात आल्यानंतर मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. मुख्याधिकारी जाधव यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून बोब-ठोक करण्यात आले.

     निषेध सभेत माजी नगराध्यक्ष डांगे म्हणाले, कुरुंदवाड हा पुरोगामी विचारांचे शहर आहे. मुख्याधिकारी जाधव यांच्या सारखा अकार्यक्षम अधिकारी प्रथमच पालिकेला लाभला. या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी.अशी जोरदार मागणी केली.

        मोर्चात वाघेला कुटुंब आपल्या मूलाबाळासह सहभागी झाले होते. यावेळी अभिजित उर्फ बबलू पवार, राजू आवळे, रघु नाईक, गौतम ढाले, शशिकांत कांबळे, दयानंद मालवेकर, दादासाहेब पाटील आयुब पट्टेकरी, विलास उगळे, सुनील कुरुंदवाडे, बाबासाहेब सावगावे,दादासाहेब पाटील, आदींनी मुख्याधिकारी जाधव यांच्यावर आरोपांची तोफ डागली.

       यावेळी अभय पाटुकले, सुनील कुरुंदवाडे, जवाहर पाटील, रमेश भुजुगडे, लियाकत बागवान, सुनील जुगळे, आर्षद बागवान, संतोष शहा, आयुब पट्टेकरी, जिनाप्पा भबीरे, उमेश कर्नाळे, दयानंद मालवेकर, रघु नाईक, अजय भोसले, मुन्ना फल्ले, संजय शिंदे, चांद कुरणे, भोला बारगिर, किरणसिह जोंग, कुदरत भुसारी, अकील गोलंदाज, बंडू उमडाळे, गोट्या बंडगर, आण्णाप्पा बंडगर, शब्बीर बागवान, आण्णासाहेब चौगुले आदी उपस्थित होते.


      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष