जयसिंगपूर शहर मॉडेल सिटी बनवायचे ध्येय : माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी वसवलेले जयसिंगपूर शहर सर्वांत सुंदर शहर आहे या शहराशी सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर आण्णा यांच्या नंतर आमच्या तिसऱ्या पिढीचे नाते कायम आहे त्यामुळे या शहरांमधील जनतेच्या व्यापाऱ्यांच्या उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी आम्हाला माहित आहेत त्या सोडवण्यासाठी मागील वीस पंचवीस वर्षात आम्ही सर्वांना सोबत घेऊन जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी खेचून आणलेला आहे यापुढेही जयसिंगपूर शहर मॉडेल सिटी बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे उदगार जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडी या पक्षाचे अध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी काढले.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोड परिसरात असलेल्या वसाहतींमधील जवळपास साडे सतरा लाख निधी मधून करण्यात येणाऱ्या अंडरग्राउंड पाईपलाईन गटारीचे उद्घाटन संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते, माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, संभाजी मोरे, पिंटू खामकर राहुल बंडगर असलम फरास प्रेमला मुरगुंडे विक्रमसिंह खाडे संजय नलावडे चव्हाण सर अरुण भिसे शंकर बजाज गजानन बेंडल बाळू बेग वासुदेव भोजने प्रवीण पाटील गणेश गायकवाड सुधीर खाडे रोहित खरात अमोल कांबळे व प्रभागातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा