जांभळीतील बंड्या प्रेमी ग्रुपच्या बैलाने जिंकली चांदीची गदा
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी येथे झालेल्या बिनदाती हातात बैल धरून पळविणे स्पर्धेत जांभळी येथील बंड्या प्रेमी ग्रुपच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावून ३ फूट चांदीच्या गद्याचा मानकरी ठरला आहे.
इचलकरंजी येथे सुमित गोसावी यांच्यावाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशी गायी - बैलांची संख्या कमी होत आहे. देशी बैल टिकविण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी बैलांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून इचलकरंजी येथे बैल हातात धरून पळविण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा