बाजार समितींच्या बळकटीकरणासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे प्रतिपादन
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
धावते जग व बदलत्या जीवनशैलीमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत असले तरी या बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले,
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती व डॉक्टर अंकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मार्केट यार्ड मध्ये आयोजित केलेल्या जयसिंगपूर कृषी महोत्सवाच्या उदघाटना प्रसंगी राज्यमंत्री यड्रावकर बोलत होते, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि याच माध्यमातून शेतकरीसुद्धा उद्योजक व्हावा या भूमिकेतून कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाली त्या त्या काळातील परिस्थिती नुसार या बाजारपेठांचे वैभव अनेक वर्षे अबाधित होते पण बदलत्या परिस्थितीमध्ये व्यापारामध्ये निर्माण झालेली स्पर्धा आणि वेगाने पुढे निघालेले सर्व घटक यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे शेतकर्यांसह व्यापारी आणि उद्योजकांनी देखील पाठ फिरवली कृषी उत्पन्न बाजार समित्या टिकल्या पाहिजेत ही शासनाची मानसिकता असून यापुढच्या काळात बाजार समितींच्या आवारात वेगळे कृषीपूरक उद्योग उभारता येतील का हे शासनाच्या विचाराधीन आहे, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या रेशीम कोष खरेदी विक्री केंद्र सुरू केले आहे याच केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी किमान दीड ते दोन एकर क्षेत्रात रेशीम कोष संदर्भात अगदी रेशीम कोष निर्मिती पासून रेशीम तयार करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया दाखवणारा प्रकल्प उभारण्याचा आमच्या वस्त्रोद्योग विभागाचा मानस आहे,लवकरच या क्षेत्रातील तज्ञांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रकल्प या ठिकाणी उभा केला जाईल असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले,
डॉक्टर अंकल चे चेअरमन विक्रम पाटील यांनी स्वागत केले प्रास्ताविकात जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषसिंग रजपूत यांनी बाजार समितीचा गौरवशाली इतिहास सांगताना या बाजार समितीच्या विस्तीर्ण जागेत शेती पूरक व्यवसायांची उभारणी करण्याबाबत शासनाने तसे धोरण आखावे व बाजार समित्यांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी केली, यानंतर डॉक्टर अंकल यांच्या वतीने प्रकाशित केलेल्या कृषी समाधान योजनेची माहिती दर्शवणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले, दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनिलकुमार यादव यांनी बाजार समिती ची माहिती व बिनविरोध निवडणुकीची परंपरा याचा उल्लेख करताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यशैली चे तोंडभरून कौतुक केले,
सुरुवातीला कृषी महोत्सवाचे उदघाटन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले, त्यानंतर त्यांनी महोत्सवात सहभागी सर्व स्टॉलना भेटी देऊन माहिती घेतली, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती महंमदशफी पटेल तसेच सर्व सन्माननीय सदस्य, शिरोळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, रामचंद्र डांगे, भालचंद्र कागले, अशोकराव माने, रावसाहेब भिलवडे, जयपाल कुंभोजे, बाबा पाटील, सहकार निबंधक प्रेमदास राठोड, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, पृथ्वीराज यादव, बाबगोंडा पाटील, बाबासाहेब भोकरे, आप्पा भोसले, प्रा.
अण्णासाहेब क्वाणे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार जयसिंगपूर कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती विजयसिंह माने देशमुख यांनी मानले सदरचा कृषी महोत्सव 25 मे पर्यंत सुरू राहील असे संयोजकांनी शेवटी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा