देव आला द्यायला पदर नाही घ्यायला ?



राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

स्वातंत्र्य सेनानी व पुरोगामी गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड चा उल्लेख केला जातो. येथील एका पुरोगामी विचाराच्या महिलेने एक प्रस्ताव ग्रामपंचायत अर्जुनवाड मध्ये आणला पण त्याचे गांभीर्य न आल्याने लाखो रुपयांची मदत हेरवाड गावाला मिळाली त्यामुळे देव द्यायला आला पण पदर नाही घ्यायला अशी अवस्था अर्जुनवाड करांची झाली असल्याची चर्चा सध्या गावात सुरु आहे.

   अर्जुनवाड येथील अंजली पैलवान या विधवा महिलेने ग्रामपंचायती कडे विधवा महिला यांच्या अन्यायला वाचा फोडणारे निवेदन दिले. त्याकडे ग्रामपंचायतीने पाठ फिरविली पण सदर निवेदनाची प्रत सरपंच ग्रुप च्या माध्यमातून हेरवाड गावच्या सरपंच यांना मिळाली त्यांनी त्याला क्षणाचा ही विलंब न करता अंमलबजावणी केली व सदर गावावर लाखो रुपयांचा निधी चा अक्षरशः वर्षाव खासदार सुप्रिया सुळे, मंत्री हसन मुश्रीफ, नीलम गोऱ्हे, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदींनी हेरवाड गावाचा गौरव केला. त्यानंतर माणगाव या ग्रामपंचायतीने शाहू महाराज स्मुर्तीशताब्दी चे औचित्य साधत हेरवाड ग्रामपंचायतीचे त्यांनी ही अनुकरण केले व त्यांना ही मोठया प्रमाणात निधी मिळणार आहे. दरम्यान श्रीमती पैलवान यांच्या पुरोगामी विचारांचे कौतुक सर्व महाराष्ट्र भर होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष