टाकळीवाडी : पोलीस असल्याचे भासवून चार तोळे सोने लंपास

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

   टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथे एका ज्येष्ठ महिलेला पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या असा 1लाख,60 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.हा प्रकार बाबगोंडा पाटील यांच्या दुकानासमोर घडली.श्रीमती विलासमती शांतीनाथ पाटील (वय 60,रा.टाकळीवाडी ता शिरोळ) असे लुबाडणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

         टाकळीवाडी येथील श्रीमती पाटील ह्या श्रीपाल गोरे यांच्या घरातून चटणीकांडपमध्ये चटणी तयार करून डब्यातुन घेवुन घरी पायी चालत जात असताना ग्रामपंचायत रस्त्यावर बाबगोंडा पाटील यांच्या दुकानासमोर 40 ते 45 वयाच्या अज्ञात दोन भामटयांनी मोपेडवरून येऊन श्रीमती पाटील यांना अडीच वाजता सुमारास अडवून टाकळीवाडी गावांत दंगा झाला आहे. कुठं चाललंय आम्ही पोलीस आहोत घरी जावा असे सांगत ह्या सोन्याच्या पाटल्या घालून फिरु नका हातातून काढा असे सांगून काढायला लावून कागदात बांधुन देतो द्या इकडे असे सांगुन हातातील सोन्याच्या पाटल्या हातचलाकीने काढून घेऊन.चटणीचे डब्यात ठेवतो असे सांगुन नकली पाटल्यांची कागदी पुडी डब्यात ठेवून भामटे फरार झाले. घरात येऊन पुडी उघडून बघितल्यानंतर नकली पाटल्या असल्याचे निदर्शनास आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष