शहिद जवान प्रशांत जाधव यांच्या पत्नीने दिली विधवा प्रभेला मुठमाती


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 लडाखमध्ये 26 जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन 7 जवानांचा मृत्यू झाला. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील बसर्गे बुद्रुक येथील प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली.प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, कोरोची या गावांनी विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेऊन राजर्षी शाहू महाराजांना अनोखी मानवंदना दिली.

दरम्यान शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर विधवा प्रथा बंद करण्यात आली. गावाने एकमताने हा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा पुरोगामी पणा पुन्हा दिसून आला आहे. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचं कुंकू कायम राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष