हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींला अनिसचा प्रेरणा पुरस्कार जाहीर
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
विधवांच्या अवहेलनेची प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने (अंनिस) 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार' जाहीर केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या दिवशी (ता.३१) हेरवाड व माणगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे त्याचे स्वरूप आहे. सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ ठाणे येथील कमल विचारे यांनी दिलेल्या देणगीतून हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराची कल्पना सुचविणारे महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळाचे प्रमोद झिंजाडे यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. अंनिसच्या अध्यक्षा सरोजमाई पाटील, डॉ. शैला दाभोलकर व अभिनेते किरण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जातील, अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी समितीच्या वतीने देण्यात आली. पुरस्कार सोहळ्यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अंनिसने केले आहे.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा