युवकांनी जैन धर्म पुढे नेण्यासाठी एकत्र यावे : स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी

 चिंचवाड येथे जैन युवा संमेलन उत्साहात



राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

सध्याच्या काळात जैन समाज विभागला जात आहे. समाज एकत्रित ठेवायचा असेल तर आजचा युवक एकत्र झाला पाहिजे. जैन समाजातील युवक जागरूक आहे फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे, तेच काम येत्या काळात जैन युवा संमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत, असे विचार जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले.

चिंचवाड ता. शिरोळ येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर चिंचवाड व जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जैन युवा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. महास्वामीजी पुढे म्हणाले, जैन समाजाने पंथ वाद बाजूला ठेवून वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्यासारखे आदर्श काम करायचे आहे. त्या दिशेने बाबासाहेबांनी उचललेले पाऊल आपणाला पुढे घेऊन जायचं आहे यासाठी युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले.

प्रारंभी स्वागत कार्तिक चौगुले यांनी केले. प्रास्ताविक सुनिल चौगूले यांनी तर सूत्रसंचालन अभय भिलवडे यांनी केले. संमेलनाचे उद्घाटन स्वरूपा पाटील - यड्रावकर त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्त्या सौ. अर्चनाताई मगदूम-गाट 'युवक-युवती संक्षमीकरण' या विषयावर बोलताना म्हणाल्या, युवका पेक्षा युवतीवर योग्य संस्कार करून सक्षम निर्णय घेण्याची क्षमता निर्णय करण्याची गरज आहे. आई-वडिलांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलमुळे युवा पिढी बिघडत आहे, त्यांच्यावर आपले धार्मिक संस्कार केल्यास युवकांचे पाऊल वाकडे पडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रा.डॉ. सुरज मडके हे 'गौरवशाली इतिहासातून उज्वल भविष्याकडे' विषयावर मार्गदर्शन केले. 

यावेळी परमपूज्य अर्यिका १०५ सुनितीमती माताजी, वीर सेवा दल अध्यक्ष शशिकांत राजोबा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जैन समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राजकुमार चौगुले, सन्मती संस्कार मंच अध्यक्ष सुरेश चौगुले, दक्षिण भारत जैन सभेचे कर्नाटक राज्य महामंत्री बाळासाहेब पाटील, वीर महिला मंडळ अध्यक्ष विजयाताई पाटील, जे. जे. पाटील, अरुण पाटील, दीपक मगदूम, जयकुमार बेले यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाला कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटक सीमा भागातील जैन श्रावक - श्राविका उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष