बेळगांव : 1 लाख 40 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

 येत्या 13 जून ला मतदान, सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान


निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

       विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्षांचे दिग्गज उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरली आहे. त्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी आणि संपर्क वाढविला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे.

       कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघामध्ये 25 हजार 388 मतदार आहेत. कर्नाटक वायव्य पदवीधर संघातील मतदारांची संख्या 99 हजार 578 आहे. याचबरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक संघामध्ये 17 हजार 973 मतदार आहेत. तसेच 78 मतदान केंद्रे असून 4 अतिरिक्त केंद्रेही स्थापण्यात येत आहेत. तर 15 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

       शिक्षक मतदारसंघातील उमेदवार : अरुण शहापूर (भाजप), चंद्रशेखर लोणी (धजद), प्रकाश हुक्केरी (कॉंग्रेस), अप्पासाहेब कुरणे, चंद्रशेखर गुडसी, जयपाल देसाई, एन. बी. बन्नूर, बसप्पा मनीगार, श्रीकांत पाटील, श्रीनिवासगौडा गौडर, श्रेनिक जंगटे, चिक्कनरगुंद संगमेश (सर्व अपक्ष)

        पदवीधर मतदारसंघातील उमेदवार : सुनील संक (कॉंग्रेस), हणमंत निराणी (भाजप), जे. सी. पटेल, यल्लाप्पा कलकुट्री, आदर्शकुमार पुजारी, घटगेप्पा मगदूम, दिपिका एस., निंगाप्पा बजंत्री, भीमसेन बागी, आर. आर. पाटील, सुभाष कोटेकल (सर्व अपक्ष).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष