दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातून ॲड सुशांत पाटील यांना पसंती
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
सहकार क्षेत्रातील अनुभव, पूरग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी सुरु असलेली चळवळ व न्यायालयीन लढाई आणि हे सर्व करीत असताना जपलेली सामजिक बांधिलकी या अनुभवातून अँड. सुशांत पाटील यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातून पाटील यांना पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान आरक्षणावर सर्व अवलंबून असले तरी संधी मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित होईल, असा विश्वास सुशांत पाटील यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबर मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई लढणारे अँड. सुशांत पाटील यांची सामाजिक तळमळ पहायला मिळते. दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात आरक्षणानंतर त्यांना जर संधी मिळाली तर ते संधीचे सोने करून तळागाळातील जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक लढतील आणि आपल्या मतदार संघाचा विकास करतील असा विश्वास सुधीर माळी, सुनिल देबाजे, गोटू तेरवाडे, मयूर खोत, जयपाल काणे, बंडू शिरढोणे, मलिकार्जुन बेडगे यांच्यासह ॲड सुशांत पाटील यांच्या समर्थकांनी केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा