दोघांना तीन वर्षांची शिक्षा ; मारहाण करून खुनी हल्ला

  


निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

शेत जमिनीत ट्रॉन्सफॉर्मर (टीसी) बसविण्याच्या कारणावरून मारहाण करून खुनी हल्ला करणाऱ्या आडी (ता. निपाणी) येथील दोघांना चिकोडी न्यायालयाने तीन वर्षे तीन महिन्यांची साधी कैद व 16000 रुपयाचा दंड ठोठावला. महादेव चिनापा कुंभार व कृष्णात महादेव कुंभार अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. 2 मे 2017 रोजी आडी येथील रामचंद्र धोंडीबा कुंभार यांच्याशी वरील कारणास्तव महादेव व कृष्णात या दोघांनी वाद करून मारहाण करून रामचंद्र यांच्यावर खुनी हल्ला केला होता. यामध्ये रामचंद्र हे गंभीर जखमी झाले होते.

       दरम्यान तत्कालीन ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निंगनगौडा पाटील, सहायक के. एस कलापगौडर, हेडकॉन्स्टेबल के.एस काडगौडर यांनी घटनास्थळी पंचनामा करून, रामचंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनिरीक्षक पाटील यांनी मारहाण करणाऱ्या दोघांवर भा. द.वि. कलम 307, 324, 504, 506 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. सरकारी वकील म्हणून वाय. बी.तुंगळ यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष