वाघेला यांच्या माघारीने मुख्याधिकारी जाधव यांना यामध्ये क्लीन चिट मिळण्याची शक्यता
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
पालिका सफाई कर्मचारी त्रिमूर्ती वाघेला यांच्या नोकरी प्रकरणी मुख्याधिकारी जाधव व काही पालिका कर्मचारी यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत वाघेला यांनी यू टर्न घेत सर्व आरोप मागे घेतल्याने जवळपास या प्रकरणाला तिलांजली मिळाली आहे. तरीही त्रिसदस्यीय समितीने याबाबत सखोल चौकशी करत आपला अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. दरम्यान वाघेला यांच्या माघारीने पालिकेच्या दोन अधिकार्यांचे निलंबन रद्द होऊन मुख्याधिकारी जाधव यांना यामध्ये क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे.
लोकप्रतिनिधीच्या मुळे मुख्याधिकारी जाधव यांना आंदोलकांचे आघात सोसावे लागले तर कृती समितीलाही शहराच्या हितासाठी आंदोलन करावे लागले.यामध्ये मात्र प्रशासन आणि आंदोलक असे युद्ध सुरू झाले. लोकप्रतिनिधी मात्र नामा-निराळेच राहिले आहे.शहराच्या हितासाठी लढणारी कृती समिती ही आजपर्यंत उपेक्षितच राहिली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा