सेवानिवृत्त शिक्षकांचे अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : अध्यक्ष . एन.डी. मारणे
नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क
सेवानिवृत्त शिक्षकांचे अडीअडचणी सोडविण्यासाठीमहाराष्ट्र पेन्शनर्स संख्या कटिबद्द असून येथील सेवानिवृत्त शिक्षकांनी लावलेली उपस्थिती पाहता संघटनेवर फार मोठा विश्वास असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन. डी. मारणे यांनी केले.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे प. पू पाटील महाराज कार्यालयात आयोजित महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे अंतर्गत कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दामोदर सुतार होते.
मारणे बोलताना पुढे म्हणाले, सेवानिवृत्त शिक्षकांचे अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटना काम करत आहे. शिवाय ही संघटना ऑल इंडिया फेडरेशन संघटना संघर्ष झाले आहेत. राज्यपातळीवर कोल्हापूर जिल्ह्यातील संघटनेचे काम फार चांगले आणि कौतुकास्पद आहे. शिक्षकांच्या आणि अडचणी पेन्शन व इतर प्रश्न प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
या वेळी 90 वर्षे वय पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा संघटनेच्यावतीने गुणगौरव करण्यात आला. त्याचबरोबर गुणी शिक्षक शिक्षिका यांचा देखील गौरव करण्यात आला.
माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पाच्यापुरे यांचे सुखी व आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयी व्याख्यान झाले. यावेळी यावेळी लक्ष्मण टेंबे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, शिक्षणाधिकारी दीपक कामत, हार्दिक काळगे आदींनी मनोगत व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष दानवाडे गुरुजी यांनी केले. आभार भोपाल दिवटे यांनी मानले. मेळाव्यास मेळाव्यात शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी व जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व तालुका अध्यक्ष शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा