श्री विद्यासागर हायस्कूलचा ५७ वा वर्धापन दिन संपन्न
अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :
अकिवाट येथील श्री बाहुबली विद्यापीठाचे श्री विद्यासागर हायस्कूलचा दि.१७ जून रोजी ५७वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.समारंभाचे अध्यक्ष शाळेचे संस्थापक अध्यक्ष कमलाकर चौगुले होते.प्रमुख पाहूणे सावनकुमार दरुरे व सारिका दरुरे होते. प्रमुख वक्ते विजय गिते होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक डी. बी वाडकर यांनी केले त्यावेळी विद्यालयाचे भविष्यातील संकल्प सांगितले व पाहूण्याचा परिचय करून दिला.समन्वय समितीचे सचिव मलिकवाडे यांनी शाळेची स्थापना, विस्तार व गुणवत्ता विकास यांची माहिती सांगितली व शाळेच्या प्रगतीमध्ये वाट असणार्या व्यक्तीचा उल्लेख केला. प्रमुख पाहुणे सारीका दरुरे यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे व वेळेचे नियोजन करून ध्येयाचा पाठपुरावा करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विजय गिते यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी महत्वकांक्षी बनावे, आईवडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शालेय जीवनात आपला पाया पक्का करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर चौगुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत शाळा सुरू झाली याचा अनुभव कथन केला.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष कमलाकर चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा व त्याची पत्नी पुष्पावती यांचा सत्कार करण्यात आला. आभार पी.व्ही.नांद्रे यांनी मानले व सुत्रसंचलन एस.वाय.पाटील यांनी केले.
या वेळी डी.जे.कल्लण्णावर गुरुजी , आदिनाथ होसकल्ले ,शालेय समितीचे सदस्य,पालक, विद्यार्थी, अध्यापक अध्यापिका, कर्मचारी सेवक पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा