भारतीय जनता युवा मोर्चाच्या अकिवाट ग्राम अध्यक्षपदी संतोष लाटवडे यांची निवड
अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ येथे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमधये विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. त्यामध्ये अकिवाट गावच्या ग्राम अध्यक्षपदी संतोष लाटवडे यांची निवड करण्यात आली. आजपर्यंत त्यांनी पक्ष वाढीसाठी होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता, याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
तसेच महेंद्रसिंग रजपूत यांची शिरोळ मंडल चिटणीस या पदी नियुक्ती करण्यात आली . यांची नेमणूक पत्रे पृथ्वीराजसिंह यादव यांनी दिली.
यावेळी रामचंद्र बेडकिहाळे,स्वप्निल शिंदे ,नंदकुमार कुलकर्णी , गजानन लाटवडे, भगतसिंगग राजपूत, अशोक गुरव व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा