वेदनेतून निर्माण झालेले साहित्यच खरे साहित्य : समेलनाधक्ष प्रा डॉ विनोद गायकवाड
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
दर्जेदार साहित्य निर्मिती साठी वेदना ह्या महतवाचा असून त्यातून निर्माण झालेले साहित्यच खरे साहित्य ठरते. तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणजे साहित्य संम्मेलन, साहित्य निर्मितीसाठी त्याग, तपश्चर्या दुःखाचा अनुभव ,सहन शिलता महत्वाचा भाग आहे. तर यातूनच खरे साहित्य निर्माण होते. व्यास व वाल्मिकी जगातील श्रेष्ट व थोरे साहित्यिक आहेत. आपल्या आई बापावर आतूट प्रेम करणाऱ्या मुली, भटकंतीचे दुःख व शोषितांच्या वेदना हे चित्रण साहित्यातून आले पाहिजे. बदलत्या काळानुसार साहित्य बदलले पाहिजे.तर जीवन कस जगाव हे साहित्य शिकविते.
असे मत व्यक्त करतांना जेष्ठ साहित्यिक, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगांवचे मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ विनोद गायकवाड म्हणाले. ते बेडकिहाळ येथील स्वर्गीय बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रविवार (ता २६) रोजी बीएस संयुक्त पदविपूर्व कॉलेज च्या रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संम्मेलन व गुणिजनांचा सत्कार समारंभा प्रसंगी सम्मेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
प पू गुरुसिद्धेश्वर स्वामीजी (कारीमठ हत्तरगी) यांच्या दिव्य सानिध्यात आयोजित करण्यात आलेल्या या साहित्य सम्मेलनाचे उद्घाटक म्हणून बेडकिहाळचे सुपुत्र जेष्ठ कन्नड साहित्यिक नाटककार , व चित्रकार, प्रा डि एस चौगले हे होते,. तर स्वागत अध्यक्ष म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षा विध्या देसाई ह्या होत्या. सकाळी ९.३० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ग्रंथ पालखी पूजन , डॉ सुमित्रा पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले, तर डॉ बाबासाहेबांच्या आंबेडकर यांच्या पुतळ्यास मलगौडा पाटील यानी मालार्पण केले. हलगी व विविध वाद्यांच्या गजरात ग्रंथ दिंडी कार्यक्रमा स्थळी आल्यावर, स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र चव्हाण प्रवेशद्वाराचे उद्घाटन दत्तात्रय पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. तर कै गोपाळ दादा पाटील साहित्य नगरीचे उद्घाटन सुदर्शन खोत यांच्या हस्ते करण्यात आले. तर कै अशोक नारे व्यासपीठाचे उद्घाटन कुषी तज्ञ सुरेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
तर या वेळी तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, महात्मा बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, जोतिबा फुले, व सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर उद्धघाटक व अध्यक्ष व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्जवलण करून कार्यक्रमाचे उध्दघाटन करणयात आले. स्नेहा कांबळे हिच्या गणेश स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.तर कार्यक्रमाचे आयोजक , शिंगाडे ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे उपस्थितांचे सवागत केले. तर प्रास्थाविक प्रा प्रकाश कदम यांनी करून शिंगाडे ट्रस्ट च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती करुन दिली. या प्रसंगी व्यासपीठावरील उपस्तीत सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी उद्घघाटक डि एस चौगले म्हणाले या परिसरात भाषा बांधव साधले जात असून हा परिसर म्हणजे द्विभाषिक परिसर म्हणू ओळ्खला जात आहे. म्हणून या मातीत मराठीतुन कन्नड, व कन्नड मधून मराठी साहित्य अनुवाद होत आहे. म्हणू तर भाषा समाजाला एक देणगी आहे.विशेष म्हणजे भाषा ह्या परस्पर एक मेकाशी ऋणी असतात.
प पू गुरूसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले अनुवाद साहित्य मद्ये हा परिसर एक महत्वाचा भाग ठरला असून या सर्वांची सांगड साधून विक्रम शिंगाडे यांचे कार्य म्हत्ववाचे ठरले आहे. विशेष म्हणजे साहित्य कधीही जुने होत नाही. सतत नित्य निरंतर नवीन स्वरूप घेत असते. लेखणी मद्ये फार मोठी ताकत आहे. अशी साहित्य संमेलन झाली पाहिजेत. यांतून मनाला वेगळी ऊर्जा मिळते.
तर समेलनाचा दुसऱ्या सत्रात, सुरेश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली "राजर्षी शाहू देशाचा इतिहासातील नवी पहाट" या विषयावर जेष्ठ साहित्यिक व संपादक श्रीराम पचिंद्रे यांचे विशेष असे अभ्यास पूर्ण व्याख्यान झाले. या वेळी त्यानी शाहू महाराजांनी सर्वसामान्य जनतेसाठी व कला परंपरा व शेती विकासाच्या धोरणे साठी आखलेल्या योजनांची म्ह माहिती दिली.
तर सम्मेलनाच्या तिसरे सत्र शांतीनाथ मांगले यांच्या विशेष हास्य मय कथा कथनाने रंगले. या वेळी त्यांनी "पाव्हन आल्यात बगायला " व "प्राण्यांना हि भाषा असते, या विनोदी ढंगातील कथा सांगून उपस्तीत साहित्य प्रेमींची मने जीकंली.
या कार्यक्रमा प्रसंगी प्रा अमर कांबळे,नितीन कुलकर्णी, प्रा वि गो वडेर, डॉ प्रा गोपाळ सुतार, सागर केसरकर, रंगराव बन्ने, डॉ दिलीप कुलकर्णी, अभय खोत, तात्यासाहेब खोत, बाळासाहेब उदगट्टी, दत्तकुमार पाटील, संजय देसाई, रावसाहेब मेलाळे, जयकुमार खोत, बाबासाहेब खोत, बाबू नारे, उपाध्यक्षा जयश्री जाधव, दादासाहेब पाटील, शीतल खोत, अशोक झेंडे, डॉ सुरेश कुराडे, जीवन यादव,दादू सनदी, यांच्या सह परिसरातील साहित्य प्रेमी मंडळी उपस्तीत होते. सूत्रसंचालन तानाजी बिरनाळे व प्रीती हट्टीमनी यानी केले तर अजित कांबळे यानी आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा