कुरुंदवाड शहरात राजर्षी शाहू महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील नगरपरिषदेच्यावतीने शहरातील विविध भागात 948 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तर शहरातील शैक्षणिक संस्था पतसंस्था बँका व नगर परिषदेमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरपरिषदेच्यावतीने आज शहरातील भैरेवाडी, बिरोबा मंदीर, लिंबू चौक, श्री. दत्त पार्क कृष्णा घाट, एस.पी. हायस्कूल, लायन्स क्लब तसेच आ.क्र.७७ औदयोगिक वसाहत परिसरामध्ये ९४८ रोपांचे वृक्षारोपण करून कुरुंदवाड शहर हरीत करणेचा प्रयत्न केलेला आहे. या वृक्षारोपणासाठी कु. पूजा पाटील, प्रदिपकुमार बोरगे, प्रणाम शिंदे, योगेश गुरव, अनिकेत भोसले, अतिश काटकर, अमोल कांबळे इ. अधिकारी वर्ग तसेच नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

     तसेच राजर्षि शाहू जयंती निमित्त कुरुंदवाड नगरपरिषद व दयावान मंडळ यांचेमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविणेत आला. या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक अनुप मधाळे, अर्जुन कोळी, विशाल मधाळे, अष्टक बुधले, कपिल, मधाळे, पनू कांबळे, वैभव मधाळे, कपिल मोहिते, स्वप्नील शितोळे, धम्मपाल ढाले इ.कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कुरुंदवाड नगरपरिषद तसेच सुरेश कडाळे फांडेशन तर्फे राजर्षि शाहू महाराज चौकाचे सुशोभिकरण करणेत आलेले आलेले असून छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटोच विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन करणेत आले. तसेच शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही या राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करुन त्यांचे विचार आचरणात आणणेचा मनोदय व्यक्त करणेत आला. या कार्यक्रमावेळी युवा  नेते श्री. सुचितोष कडाळे, बाबासाहेब कडाळे, दिपक कांबळे, अरुण दत्ता कांबळे, आकाश गुंडाप्पा कडाळे, बशीर मोमीण, संजय ढाले इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

    येथील माळ भागावरील शाहू चौकांमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, दीपक गायकवाड, अक्षय आलासे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, प्रा. जे. पी. जाधव, आप्पा बंडगर, शरद कडाळे, दीपक कांबळे, जय कडाळे, अमोल मधाळे, साहिल शेख, दिलीप बंडगर या मान्यवर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष