... दूध पावडरचा विषय कोर्टात ; कारवाई अटळ ?

चोरी प्रकरणातील संशयितांना जामिन

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

मजरेवाडी हद्दीतील धरणगुत्ते यांच्या गोडावून मधीन दूध पावडर चोरी प्रकरणातील तिघांना आज सोमवारी जामिन मिळाला असून कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दूध पावडरचा विषय कोर्टात गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोर्टाच्या निर्णयानंतर जर हा विषय अन्न औषध प्रशासनाकडे गेला तर सदरची दूध पावडर गोडाऊनमध्ये कोठून व कशासाठी आणली होती याचा उलगडा होणार आहे. यामध्ये संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास कारवाई नक्की होईल, असा विश्वास अन्न औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे.

दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ भेसळ प्रकरणी दूध पावडरचा सर्रास वापर केला जातो. अशा दूध पावडरच्या गोडाऊनवर या आधी अन्न औषध प्रशासनाच्या वतीने शिरोळ तालुक्यात मोठ्या कारवाया झालेल्या आहेत. इतकेच नव्हे तर शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्यातून दूध पावडरचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरू आहे. त्यामुळे धरणगुत्ते यांच्या गोडावून मधून चोरी झालेली दूध पावडर कोठून आणली गेली? कशासाठी आणली गेली ? याचा उलगडा लवकरच होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष