सर्वोत्तम कामगिरी करून पारीतोषिक मिळवलेल्या संस्था व अधिकाऱ्यांच्यावर पुस्तक लिहणार : कोतवाल
कोल्हापूर  / शिवार न्यूज नेटवर्क
 वातावरणामधील होणार्या बदलाचे दुष्परीणाम रोखण्यासाठी निसर्ग जपला पाहीजे या उद्देशाने राज्यशासन राबवत असलेल्या ‘माझी वसुंधरा ’ अभियाना अंतर्गत स्थानिक संस्था व अधिकार्यांना आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात येतं. वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकास करणार्या या स्थानिक संस्था व अधिकार्यांच्या कामाचा लेखाजोखा माडणारं पुस्तक लेखक गौतम कोतवाल लिहीत आहेत. 
 गौतम कोतवाल हे प्रथितयश लेखक असून आजपर्यंत 1000 हून जास्त उद्योजक व प्रशासकीय अधिकार्यांच्या कामाचा आढावा घेणार्या 40 पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं आहे. या पुस्तकात बक्षीस विजेत्या महानगरपालिका गटात नवी मुंबई महानगरपालिका, सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, सातारा नगर परीषद, अहमदनगर महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, मिरा भाईंदर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका
तर नगर परिषद गटात कराड नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, बारामती नगरपरिषद, पौनी नगरपरिषद, बुलढाणा नगरपरिषद, मुरगुड नगरपरिषद, शेंदुरजणा घाट नगरपरिषद, हिंगोली नगरपरिषद, सावंतवाडी नगरपरिषद, उमरेड नगरपरिषद, संगमनेर नगरपरिषद, पन्हाळा नगरपरिषद 
तसेच नगर पंचायत गटात कर्जत नगर पंचायत, शिर्डी नगर पंचायत, शेंदुर्णी नगर पंचायत, मालेगांव बु. नगर पंचायत, कुही नगर पंचायत, दहिवडी नगर पंचायत, समुद्रपुर नगर पंचायत, नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत, पालम नगर पंचायत, म्हसळा नगर पंचायत, सिंदेवाही नगर पंचायत, अकोले नगर पंचायत, चंदगड नगर पंचायत 
आणि सर्वोत्तम कामगिरी करणार्या महसूली विभागात राज्यस्तरावरील पुणे व नाशिक महसूल विभाग,
 सर्वोत्तम कामगिरी करणारे जिल्हे कोल्हापूर, सातारा, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, सोलापूर 
राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणार्या जिल्हयांमध्ये अहमदनगर, सांगली, नाशिक, अमरावती, हिंगोली, रायगड, चंद्रपूर, जळगाव, सातारा या सर्व विभागातील ‘माझी वसुंधरा’ अभियाना अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करून पारीतोषिक मिळवलेल्या स्थानिक संस्था व अधिकार्यांचा समावेश असणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा