नामदार यड्रावकर यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते जयसिंगपूरात एकवटले
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क
शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यात येत असल्याने नामदार यड्रावकर यांच्या समर्थनार्थ जयसिंगपूर येथे हजारो कार्यकर्ते एकवटले आहेत.
जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर ६ येथे असणाऱ्या यड्रावकर यांच्या ऑफिसकडे येणारे सर्व मार्ग पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. दरम्यान शिरोळ तालुक्यासह परिसरातील यड्राककर प्रेमी हजारो संख्येने एकवटले आहेत. यावेळी नामदार यड्रावकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु आहे. या ठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा