हेरवाड मधील दानशूरांनी फेडले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे कर्ज

  शिवार न्यूजच्या वृत्तानंतर मिळाला मदतीचा ओघ

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

सैनिक लढला तर देशाच्या सीमांचे रक्षण होते आणि शेतकरी राबला तर देशाचे पोट भरते. राजकारणी शेतकऱ्यांचा केवळ उदो-उदो करतात. मात्र त्यांच्यासाठी काही करायची वेळ आली की, मागे हटतात. कर्जाचा भर असह्य झाल्याने हेरवाड गावातील शेतकरी काडगोंडा खडके (वय३०) या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला बरोबर आठ महिने पूर्ण झाले. मात्र अद्याप त्याच्या कुटुंबाला सरकारकडून फुटकी कवडीही मिळालेली नाही. याबाबत शिवार न्यूजने खडके कुटुंबाची व्यथा बातमीच्या माध्यमातून समाजासमोर मांडली होती. याची दखल घेऊन हेरवाड येथील 'हेरवाड विकास' या व्हॉटसॲप ग्रुपवरील दानशूर व्यक्तींनी एकत्र येवून सदर कर्जबाजारी शेतकऱ्याचं पीक कर्ज फेडून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

शासनाचे दुर्लक्ष, राजकीय पुढाऱ्यांचे आश्वासनामुळे हेरवाड येथील कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा संसार वाऱ्यावर पडला आहे. 

काडगोंडा खडके हा शेतकरी कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेवून गेल्या आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने खडके कुटंबियांवर आर्थिक संकट ओढावले होते. घरात त्याची आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असल्याने संसाराचा गाढा ओढणे या कुटूंबियांना जिकिरीचे बनले होते. काडगोंडा हा शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्याच्या घरी भेट देवून कुटूंबियांचे सांत्वन केले व मदतीचे आश्वासन देवून गेले होते, मात्र, शासकीय पातळीवर अद्याप आम्हाला कोणतीही मदत मिळाली नसल्याची खंत खडके कुटूंबियांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यापासून शासकीय मदतीसाठी शासकीय कार्यालयांची उंबरठे झिजवून देखील अद्याप शासनाची मदत मिळाली नसल्याने याबाबत शिवार न्यूजने खडके कुटुंबाची व्यथा बातमीच्या माध्यमातून समाजासमोर मांडली होती. याची दखल घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येवून संबंधित शेतकऱ्याचे पीक कर्ज फेडून खडके कुटूंबाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

यांनी दिला मदतीचा हात

 'हेरवाड विकास' या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला यामध्ये मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे, मैत्री फौंडेशनचे चंद्रकांत छाजड, जानकी वृद्धाश्रमचे बाबासो पुजारी, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, पत्रकार संतोष तारळे, कॉ. शिवाजी माळी, भरत पवार, सुहासराव नेर्ले, हाजी मेहबूब बादशहा मुजावर, डॉ. अविनाश सुतार, संभाजी सिद, सुभाष नलवडे यांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष