हेरवाडमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड हायस्कुल हेरवाड,कुमार विद्यामंदिर हेरवाड, कन्या विद्यामंदिर हेरवाड व ग्रामपंचायत हेरवाड यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार विद्या मंदिर हेरवाडच्या पटांगणावर जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. हायस्कुल हेरवाड चे सहाय्यक शिक्षक अशोक निर्मळे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत हेरवाड चे सरपंच व सदस्य या सर्वांनी योगासन करून योगसाधना केली. यावेळी अनुलोम विलोम प्राणायाम, भस्त्रिका,कपालभाती,शशांकासन,मर्कटासन,भुजंगासन,वृक्षासन ,इ.प्रकार करण्यात आले. सर्वांनी अतिशय उत्साहाने योगासन व प्राणायाम करुन आरोग्याचा मूलमंत्र जपला.यावेळी कुमार व कन्या विद्या मंदिर चे मुख्याध्यापक सुभाष तराळ,श्री.सिदनाळे, सर्व शिक्षक व हेरवाड हायस्कूल च्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे व सर्व शिक्षकवर्ग ,तसेच ग्रामपंचायत हेरवाड चे सरपंच सुरगोंडा पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.. आभार मनिषा डांगे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा