दानवाड हायस्कूल दानवाडचा दहावी परीक्षेत १०० टक्के निकाल
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दानवाड हायस्कूल दानवाड या हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयाने सलग तीन वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व ३० विद्यार्थी पैकी ३० विद्यार्थी पास झालेले आहेत. आलिशा महमंद लाडखान या विद्यार्थिनींनी ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय सृष्टी पोपट सुतार ९६.२० टक्के, तृतीय श्रुती उमेश पोळ ९५.८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. या विद्यालयातील ८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, २० विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर २ विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पोळ सर, देसाई सर, मिसाळ सर, पाटील सर, देशमुख सर, पोवार सर, संस्था अध्यक्ष शिवगोंडा पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर- कर्मचारी, पालक या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा