तमदलगे येथे चारा प्रक्रियेवर प्रात्यक्षिक सादर
गोमटेश पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :
तमदलगे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी अंतर्गत शरद कृषी महाविद्यालय ,जैनापूर यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम अंतर्गत गावातील शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत चौका नजीक ' चारा प्रक्रिया ' या विषयावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाच्या वतीने कृषिकन्या स्नेहल बुबणे,भाग्यश्री ककमरे,माधवी कुलकर्णी,स्नेहल माने, बिबिहाजरा मुल्ला,राधिका निर्मळ आणि अश्विनी पाटील यांनी प्रात्यक्षिक घेतले. यामध्ये चारा प्रक्रियेचे महत्व तसेच युरिया चा वापर करून चारा प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी
रामचंद्र मजलेकर,रमेश पाटील, अण्णासो पाटील,विशाल गावडे,कुमार सुतार,वसंत गोदे,श्रीकांत पाटील,सुनीता रुग्गे,सुरेखा चौगुले,भारती मजलेकर, इ. शेतकरी उपस्थित होते.या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा