'तो' फतवा मागे घ्या अन्यथा स्वाभिमानी शांत बसणार नाही : बंडू पाटील



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 महापुराच्या पाण्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडल्यास संबंधित मालकांवर कारवाई करण्यात येईल, असा अजब फतवा अधिकाऱ्यांनी काढला आहे. पूरग्रस्तांवर अन्याय करणारा हा फतवा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही असाइशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पठाण यांना दिला आहे. 

गेल्या काही वर्षापासून येणाऱ्या पंचगंगा नदीच्या महापुरामुळे नदीकाठावरीलगावातील नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामध्ये पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. पशुसंवर्धन विभागाने तसेच महापूर आतून जनावरे बाहेर काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वाहने उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांची जनावरे दगावणार नाहीत. हा फतवा काढून पशुसंवर्धन विभागाने पूरग्रस्तांची चेष्टा केली आहे. कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही की आपलं जनावर आपल्यासमोर मरावं, पशुसंवर्धन विभागाने हा फतवा काढण्यापेक्षा जनावरांना जून महिन्याच्या अगोदर घटसर्प आणि फऱ्याचे लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असताना पशुसंवर्धन विभागाने सदरचे लसीकरण पूर्ण केले नाही. या रोगामध्ये अनेक जनावरे तसेच शेळ्यामेंढ्या दगावतात याला जबाबदार कोण ? असा सवालही पाटील यांनी व्यक्त करून पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्याला महापुरात बेटाचे स्वरूप प्राप्त होते, अशा वेळी शेतकरी जनावरे नेणार तरी कसे, सध्या शेतकरी वर्गाने ही काळजी घेतली असून महापुराच्या पार्श्वभूमीवर आपली जनावरे सुरक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. अशी असतानादेखील पशुसंवर्धन विभागाने जनावरे दगावली संबंधित मालकावर गुन्हा दाखल झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही असा इशारा बंडू पाटील यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष