सोयाबीन अहवाल दुरुस्ती बाबत उप विभागीय कृषी अधिकारी यांना आंदोलन अंकुशच्या वतीने निवेदन

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

सोयाबीन उत्पादन अहवाल दुरुस्ती बाबत उप विभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांना आंदोलन अंकुशच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाबीज बियाणे कंपनीकडून बीजोत्पादनासाठी वितरित करण्यात आलेले के डी एस ७२६ व के डी एस ७५३ या जातीचे सोयाबीन पिक सर्वेक्षण अहवालामध्ये तापमान वाढीचा चुकीचा निकष व नुकसानीची टक्केवारी कमी दाखवल्या बाबत . 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज या संशोधन केंद्रातून के डी एस ७२६व के डी एस ७५३या जातींचे सोयाबीन बियाणे प्रसारित करण्यात आले होते सदर जातीचे बियाणे सन २०२१ -२२उन्हाळी हंगामासाठी महाबीज कंपनीकडून बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रसारित करण्यात आले होते पण सदर सोयाबीन पिकाची बेसुमार वाढ होऊन अत्यंत कमी फळधारणा होऊन पिकच आले नाही. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांची मेहनत पूर्ण वाया गेलेलि आहे त्या बाबतीत आपल्या कृषी खात्याकडून सदर सर्वेक्षण पूर्ण करून शासनास सादर करण्यासाठी अहवाल बनवण्यात आलेला आहे त्यामध्ये तापमान वाढीचा मुद्दा आपण लावलेला आहे जर तापमान सहन करू शकत नसेल तर सदर वरायटी महाबीज कंपनीकडुन उन्हाळी हंगामासाठी का दिली? व त्या ठिकाणी ९३०५ व्हरायटी चे उत्पादन एकरी 12 क्विंटल शेतकऱ्यांना मिळते त्यामुळे तापमान सहनशील नसलेली व्हरायटी उन्हाळ्या हंगामाला देऊन महाबीज ने शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे .तसेच आपल्याकडे हेक्‍टरी सोयाबीनची उत्पादकता 20 ते 25 क्विंटल इतकी आहे तीही आपणाकडून कमी दाखवण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे 70 ते 80 टक्के नुकसानीची टक्केवारी कमी करून आपण 50 ते 60 टक्केवर आणलेली आहे. त्यामुळे तापमान वाढीचा मुद्दा हा यामध्ये येत नाही तर तापमान सहनशील नसणारी व्हरायटी उन्हाळ्यामध्ये देऊन शेतकऱ्यांचे नुकसान केल्याबद्दल आणि नुकसानीची टक्केवारी 70 ते 80 टक्के आहे असा अहवाल दुरुस्ती करून आपणाकडून शासनास सादर करण्यात यावा म्हणून जिल्हा स्तरीय बीज गुण नियंत्रण व चौकशी कमिटीचे अध्यक्ष तथा उप विभागीय कृषी अधिकारी श्री मकरंद कुलकर्णी यांना आज निवेदन देण्यात आले.

यावेळी धनाजी चुडमुंगे दिपक पाटील दत्तात्रय जगदाळे आप्पा कदम रोहन पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष