देवपुष्प इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 'योगा डे' साजरा
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
जगाला शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेची, आरोग्याची पर्वणी देणारा, भेट देणारा आंतरराष्ट्रीय योगा दिन हेरवाड येथील देवपुष्प इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय योग संस्कृतीची व सामर्थ्याची जगभरामध्ये दखल घेतलेली आहे असा शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती साठी आवश्यक असणारा योगा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येत आहे. शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी योगा आजच्या काळात किती महत्त्वपूर्ण आहे हे जगभरातील लोकांना पटलेलं आहे. आणि त्यामुळेच जगभरामध्ये 21 जून हा भारतीय उपखंडातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा दिवस योगा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून येथील देवपुष्प इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनुलोम विलोम प्राणायाम, भस्त्रिका,कपालभाती,शशांकासन,मर्कटासन,भुजंगासन,वृक्षासन इत्यादी योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी स्कूलचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा