आलास, कवठेगुलंद परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी : ग्रामस्थ भयभीत

संग्रहित फोटो

आलास / शिवार न्यूज नेटवर्क :

शेडशाळ, कवठेगुलंद मार्गावरील वारनोळे घर, आलास माळ हद्दीतील धनश्री हॉटेलच्या मागील बाजूस बिबट्या सदृश्य प्राणी ऊस शेतात जाताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. यामुळे युवक तसेच वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी घटनास्थळी प्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऊस शेतात उसे आढळून आल्याने ग्रामस्थात भितीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शेडशाळ हद्दीतील वारनोळे यांच्या घराजवळील ऊस शेतात काही शेतकऱ्यांना बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने खळबळ उडाली. या घटनेचे वृत्त शेडशाळ, कवठेगुलंद गावात पसरले. यामुळे ग्रामस्थ तसेच वजीर रेस्क्यू फोर्सचे रौफ पटेल व सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या सदृश्य प्राणी शेतातून तकडे मळा येथे गेला असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्यानंतर सदर प्राणी गडगे वस्ती येथे येथून आलास हद्दीतून मुख्य मार्ग ओलांडून धनश्री हॉटेलकडे जाताना वाहनधारकांना निदर्शनास आले त्यानंतर आलास हद्दीतील हॉटेल धनश्रीच्या मागे असलेल्या ऊस शेतातून आलास मंगावती दिशेने पुढे गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे याठिकाणी युवक व वजीर रेस्क्यू फोर्सने ऊस शेतात जाऊन शोध घेतला असता उसे आढळून आले. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. वनविभागाने सापळा लावावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष