फुले-शाहू-आंबेडकर हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक : राजू आवळे

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्रातील समाजसुधारणच्या चळवळीचे नांव ज्या तीन महापुरूषांचे नांव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर. फुले-शाहू-आंबेडकर हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. इथल्या मातीच्या कणा-कणात या महापुरूषांच्या कार्याचा सुगंध दरवळत आहे. असे प्रतिपादन कुरुंदवाडचे माजी नगरसेवक राजू आवळे यांनी केले. 

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सावगांवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जसे स्वराज्याच्या जाज्वल्य भावनेचे प्रतिक आहेत. तसे फुले-शाहू-आंबेडकर हे समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या भावनेचे प्रतिक आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महात्मा फुले यांना आदर्श मानायचे. महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेचा वारसा खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालविला. आज संपूर्ण देशातील बहुजन, दलित समाजातील जनता व चळवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानते हीच जनता व चळवळ महात्मा फुले व शाहू महाराज यांना गुरूस्थानी मानते. खऱ्या अर्थाने या चळवळीत महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता, सुवर्णमध्य साधणारा दुवा म्हणून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य शब्दात न सामावणारे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिपा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी अभिजित पाटील,अर्शद बागवान,महावीर आवळे, विलास उगळे,सुनील जुगळे,गोटू बंडगर, कृष्णा लोकरे,अभिजित पवार, तानाजी आलासे, शाहीर आवळे, प्रा. रणजित आवळे, पिंटू नरके आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष