धनगर समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज : संजय वाघमोडे
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
समाजाचा विकास करायचा असेल तर आपापसातील मतभेद विसरून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे तरच समाजाचा विकास होईल धनगर समाजाच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत परंतु आपण मोठ्या संख्येने असूनही एकत्र येत नसल्याने आपल्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात आहे. आज इतर सर्व समाज एकत्र येत असताना धनगर समाज मात्र आपापसातील हेवे-दावे आणि वादामुळे विखुरला जात आहे. त्यामुळे समाजाच्या विकासाला गती मिळत नाही. यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने जनजागृती अभियान राबवून समाजाला एकत्रित करण्याच्या प्रयत्न सुरू आहे. यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाघमोडे यांनी केले.
यशवंत क्रांती संघटनेच्या जयसिंगपूर येथील  हाॅटेल सनसिटीमध्ये आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात वाघमोडे बोलत होते. यावेळी कैलास काळे बोलताना म्हणाले, यशवंत क्रांती संघटना ही मेंढपाळ व तळागाळातील  लोकांच्यासाठी कार्यरत असून मदतीला धावून जाणारी एकमेव संघटना म्हणून कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळ बांधव वाड्यावस्त्यावर राहणाऱ्या समाज बांधवांच्या प्रश्नावर वाचा फोडून न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून अनेक मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळवून ही दिली आहे. करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर यांनी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंतच्या केलेल्या कामाचा आढावा सांगून जास्तीत जास्त युवकांनी संजय वाघमोडे  यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या यशवंत क्रांती संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल पुजारी जिल्हा संघटक पिंटू गावडे शिरोळ, तालुकाध्यक्ष दादासो गावडे राधानगरी, तालुका अध्यक्ष सुनील शेळके कागल, तालुका अध्यक्ष संदिप हजारे  शिरोळ, तालुका संघटक दिपक वठारे , सामाजिक कार्यकर्ते यशवंत भानुसे
यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिरोळ तालुक्यातील  पदाधिकारी निवडी करण्यात आल्या नूतन पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आली
तालुका कार्याध्यक्ष - जगन्नाथ पुजारी उदगाव, तालुका संपर्क प्रमुख -संदीप आरगे शिरोळ, तालुका युवक अध्यक्ष - योगेश बंडगर नांदणी, तालुका कार्यकारिणी सदस्य -अनिल पुजारी उदगाव, उदगाव विभागीय अध्यक्ष - सागर पुजारी उदगाव, शेडशाळ विभागीय अध्यक्ष -अविनाश गुपचे शेडशाळ, उदगाव शाखाध्यक्ष - सुशांत बंडगर, उदगाव शाखा उपाध्यक्ष - नितीन पुजारी यांची निवड करण्यात आली. 
 यावेळी राधानगरी तालुका संपर्कप्रमुख रामचंद्र देवणे सामाजिक कार्यकर्ते अमोल पुजारी उदगाव, संतोष बंडगर उदगाव, सुनील बंडगर उदगाव, नितीन पुजारी उदगाव, सुशांत राजाराम बंडगर उदगाव, राकेश कांबळे उदगाव, दीपक वठारे नांदणी, संदीप घाडगे, योगेश बंडगर नांदणी, आदित्य बंडगर, दीपक मगदूम, शिरोळ, हर्षद निकम, आकाश पुजारी, रघुनाथ पुजारी शिरोळ, बिरू पुजारी, श्रीकांत रावसाहेब सुतार, तसेच यशवंत क्रांती संघटनेचे शिरूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा