चातुर्मास निमित्त श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचे बोरगाव नगरीत मंगल प्रवेश
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व 105 निर्वाण लक्ष्मी माताजी यांचा चातुर्मास बोरगाव नगरीत होणार असून या निमित्त आज माताजींचा बोरगाव नगरीत मंगल प्रवेश झाला.
आज सकाळी येथील जैन गुंफा येथे श्री आदीसागर भगवंतांचे दर्शन व पंचामृत अभिषेक झाल्यानंतर माताजींचे बोरगाव नगरीतून भव्य स्वागत करण्यात आले. येथील १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चीक्कबस्ती या ठिकाणी माताजींचा चातुर्मास कार्यक्रम चार महिने चालणार असून या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावक रत्न रावसाहेब पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या कुटुंबीयांकडून माताजींचे पाद पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले .यावेळी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे जलाभिषेक, दुग्धाभिषेक सह पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर माताजींनी या चातुर्मास काळात जैन धर्मातील आचार्य ,विचार ,तत्त्व ,सिद्धांत त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमाची माहिती देण्यात येणार आहे .जैन धर्मियांमध्ये चातुर्मासला एक वेगळे महत्त्व आहे .त्यासाठी सर्वांनी या धार्मिक वातावरणात सहभागी झाल्यास पुण्य प्राप्त होते असे सांगितले.
याप्रसंगी श्रावक रत्न रावसाहेब पाटील, उद्योजक अभिनंदन पाटील ,सौ मीनाक्षी पाटील, सौ धनश्री पाटील, अभय करोले अभयकुमार मगदूम ,राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, कुमगौडा पाटील ,महावीर पाटील, अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब भोजकर, राजू पाटील ,बाळासाहेब हावले, राकेश फिरगन्नवर, थोराप अनिल,शोभा हावले, उज्वला पाटील,भारती पाटील, संमती पाटील, श्रीमंधर पाटील ,शिवगौडा तमन्नावर, यांच्यासह जैन श्रावक श्राविका उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा