बेडकिहाळ येथील शिंगाडे सेवाभावी संस्थेच्या वतीने १५ रोजी सर्व रोग मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बेडकिहाळ, ता निपाणी येथील कै बसवंत नागु शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने शुक्रवार (ता, १५) जुलै रोजी कुसुमावती मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील गरजू रुग्णांणी या शिबिराचा घ्यावा असे आवाहन शिंगाडे चॅरिटेबल टरष्टचे संस्थापक डॉ विक्रम शिंगाडे यांनी माहिती दिली.

     या बाबत अधिक माहिती देताना शिंगाडे म्हणाले शुक्रवार (ता १५) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरा प्रसंगी नारायणी हिस्पिटलचे डॉ पूनम नाईक यांच्या सहकार्यने मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी करण्यात येत असून सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. व ५० टक्के सवलती मध्ये चस्मा देण्यात येत येणार आहे. तर अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ अमोल खुरपे यांच्या वतिने ' स्त्रीरोग व वंधत्व मोफत तपासणी करण्यात येत आहे.  तसेच डॉ मयूर एन एस, यांच्या वतीने हर्निया, भगींदर, संधीवात,थायरॉईड, मूळव्याध किडनिस्टोन, अपेंडिक्स,व पित्ताशयातिल खडे आधीवर उपचार करण्यात येणार आहेत.

    तर ब्रम्हनाथ दंतचिकित्सालयाचे डॉ शीतल चौगले यांच्या वतीने दंत चिकित्सा,उपचार व सल्ला देण्यात येत असून याच दिवशी दात काढणे मोफत करण्यात येणार आहे. दिया हॉस्पिटल चिक्कोडी चे डॉ संजय पाटील यांच्या वतीने मोफत मधूमेह,अस्थमा, गुडघे दुखी, कंबरदुखी व ई सि जी व रक्तदाब तपासणी व अँजिओग्राफी, करण्यात येणार आहे.  याच बरोबर डॉ विनय नरसाइ मेडिटेक लॅब शांतीनगर सर्कल यांच्या मार्फत शिबीरात मोफत रक्तगट तपासणी करण्यात येत असून इतर सर्व रक्त तपासणीवर ५० ते ६० टक्के सवलत देण्यात येत असून रक्त तपासणी प्रोफईल उपलब्द करण्यात येत आहे. अशी हि माहिती विक्रम शिंगाडे यांनी दिली आहे तरी परिसरातील गरजू नागरिकांनि या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करणात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष