जातीनिहाय जनगणना न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार- शब्बीर अन्सारी
इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क :
ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट काही मोठ्या पक्षाने रचला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी समाजाची जनगणना झालेली नाही. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी सांगितले.
अन्सारी पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण कमी केले. तसेच आता जातीनिहाय जनगणना झाली नाही तर अन्य आरक्षण ही कमी होईल. १९३१ पासून आज पर्यंत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झालेली नाही. ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची आमची मागणी आहे. याबाबत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत आवाज उठवलेला होता. तरी अद्याप ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली नाही. जातीनिहाय जनगणना झाली नाही तर ओबीसीचे भवितव्य संपेल. गेल्या ४० वर्षापासून ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत. जनावरांची जनगणना होते. मात्र ओबीसीची जनगणना होत नाही. हे आश्चर्यकारक बाब आहे. ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. जर झाली नाही तर ओबीसीचे भवितव्य अवघड असल्याचा इशारा त्यांनी दिला. ओबीसींनी आपल्या हक्कासाठी लढा उभारायला हवा असे आवाहन ही अन्सारी यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा