कोजिमाशि' च्या चेअरमनपदी डॉ .डी .एस. घुगरे तर व्हाईस चेअरमनपदी पांडूरंग हळदकर यांची बिनविरोध निवड

 


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

    कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी डॉ .डी.एस. घुगरे ( आदर्श विद्यानिकेतन मिणचे, ता . हातकणंगले ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी पांडूरंग हळदकर ( दौलत विद्यामंदिर मडीलगे, ता . भुदरगड ) यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली . या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या .बैठकिच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप मालगावे होते . निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली .

       निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी केले. शाहुुपुरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी डी .एस. घुगरे व व्हाईस चेअरमनपदासाठी पांडूरंग हळदकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप मालगावे यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले . चेअरमन पदासाठी घुगरे यांचे नाव संचालक बाळ डेळेकर यांनी तर व्हाईस चेअरमन पदासाठी हळदकर यांचे नाव संचालिका सौ .ऋतुजा पाटील यांनी सुचविले .

            यावेळी नुतन संचालक बाळ डेळेकर , राजेंद्र रानमाळे , अनिल चव्हाण , प्राचार्य श्रीकांत पाटील , मदन निकम , सुभाष खामकर , अविनाश चौगले , दिपक पाटील , राजेंद्र पाटील , श्रीकांत कदम , जितेंद्र म्हैशाळे, शरद तावदारे , उत्तम पाटील , प्रकाश कोकाटे , मनोहर पाटील , सचिन शिंदे , राजाराम शिंदे , सौ .ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ आदीसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे , प्रशासन अधिकारी उत्तम कवडे , संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते 

            निवडीनंतर नुतन चेअरमन , व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला . सभासदांनी ' स्वाभिमानी सहकार ' आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एकहाती सत्ता दिली . त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन दिलेल्या वचननाम्याची वचनपुर्ती टप्याटप्याने केली जाईल अशी ग्वाही आघाडीप्रमुख दादासाहेब लाड यांनी यावेळी दिली . 

         आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन डी .एस. घुगरे व व्हाईस चेअरमन पांडूरंग हळदकर यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष