दत्तवाड परिसरात पेन्शनच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक
इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड परिसरात दत्तवाड, दानवाड, घोसरवाड आदी परिसरामध्ये पेन्शन योजना चालू करतो असे सांगून पेन्शनच्या नावाखाली वृद्धांची लुबाडणूक होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
देशातील प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील वृद्धांना मदत करण्यासाठी वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरू केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने राज्यातील ६५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व वृद्धांसाठी महाराष्ट्र वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत म्हणून वृद्धांना ठराविक रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ वयोवृद्ध पुरुष व महिला घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे हा मुख्य उद्दिष्ट या योजनेचा आहे. शासनामार्फत चालवण्यात येणारी या योजनेचा उद्दिष्टे उदरनिर्वासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते आणि घरातून किंवा बाहेरून मदत मिळाली नाही तर त्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नाही. त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने वृद्ध काळ पेन्शन योजना सुरू केली आहे. या रकमेतून वृद्ध पुरुष स्त्री त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतात. पण दत्तवाड परिसरातील काही एजंट वयोवृद्ध नागरिकांना भेटून तुम्हाला पेन्शन सुरू करतो असे सांगत त्यांच्याकडून हजार ते पाच हजार रुपयांची मागणी करत आहेत. सरकारने वृद्धांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना चालू केले आहेत परंतु पैसे घेऊन पेन्शन मंजूर करणाऱ्या, या एजंटाची नेमणूक कोणी केली? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
दत्तवाड येथील शासकीय कार्यालयाच्या परिसरात फिरणारे एजंट वृद्ध नागरिक व त्यांच्या नातेवाईकांना हेरतात व तुमची पेन्शन सुरू करून देतो. परंतु त्यासाठी पैसे लागतात असे सांगून वृद्ध नागरिकांकडून जास्तीचे पैसे उकळतात तरी अशा वृद्धांची पेन्शनच्या नावाखाली लुबाडणूक होत आहे. त्यामुळे या एजंटाचा हस्तक्षेप रोखण्यासाठी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा