शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची उद्या रविवारी ३७ वी जनरल सभा
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, कुरुंदवाड ता. शिरोळ या संस्थेची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.३१ जुलै २०२२ इ. रोजी सकाळी १० वाजता जैन सांस्कृतिक भवन कुरुंदवाड येथे संपन्न होणार आहे.
संस्थेच्या सेवानिवृत्त सभासद,शिक्षक बँकेचे नूतन संचालक,इयत्ता- १०वी,१२वी गुणानुक्रमानुसार यशस्वी विद्यार्थी, इयत्ता- ५वी व ८वी शिष्यवृत्ती,नवोदय परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तरी सर्व सभासद बंधू -भगिनींनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेचे सभापती व संचालक मंडळांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा