मुख्याध्यापकावर दंडात्मक कारवाई करून अनुष्का भेंडे यांच्या* कुटुंबाला ताबडतोब न्याय द्यावा अन्यथा आंदोलन

 चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांचा प्रशासनाला इशारा  


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        सोमवारी ढोणेवाडी मराठी शाळेत झालेल्या घटनेबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी अनुष्का भेंडे यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन भेंडे कुटुंबाचे सांत्वन केले त्यानंतर राजू पवार यांनी घटना घडलेल्या ठिकाणी भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी केली तत्पूर्वी रेंदाळ रोडवर असणाऱ्या माळावरील शाळेला भेट देऊन शाळेतील संबंधित शिक्षकांच्या बरोबर बैठक घेऊन घटनेबाबत माहिती घेतली सदरच्या माहितीमध्ये शाळेचे हेडमास्तर यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा करण्यात आला शाळेचे हेडमास्तर नाटेकर हे संबरगी तालुका अथनी येथील असून धोंडेवाडी शाळेमध्ये येऊन चार वर्षे झाली मात्र ते ड्युटीवर कधीही हजर नसतात,पंधरा दिवसातून ,महिन्यातून एक वेळा येतात आणि मस्टर मध्ये सही करून जातात असे गेली चार वर्षे चालू असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी गावातील अनेक नागरिकांनी"शाळा सुधारणा कमिटीने" संबंधित शिक्षण अधिकारी यांना बऱ्याच वेळा निवेदन देऊन तोंडी सांगून सुद्धा संबंधित शिक्षण अधिकारी यांनी कधीही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही सतत दुर्लक्ष तसेच या शाळेमध्ये शाळा सुधारणा कमिटी असून या शाळा सुधारणा कमिटीला अध्यक्ष उपाध्यक्ष नाहीत शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक व्यवहार करण्यासाठी सध्याच्या अध्यक्षांची सही लागते मात्र माजी अध्यक्षांची सही घेऊन कारभार चालवला जातो यासंबंधी सुद्धा संबंधित शिक्षण अधिकारी त्यांना वारंवार निवेदन देऊन तोंडी लेखी सांगून सुद्धा त्यांनी आजतागायत या कामाकडे दुर्लक्ष केले आहे तसेच सदरचे नाटेकर मुख्याध्यापक यांच्या बद्दल ढोणेवाडी गावातून भरपूर तक्रारी आहेत मात्र वरिष्ठ अधिकारी या गोष्टीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले असून या शैक्षणिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि हेडमास्तर नाटेकर यांच्या अक्षम दुर्लक्षामुळे इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी अनुष्का सदाशिव भेंडे या कोवळ्या जिवाचा बळी गेला असून शाळेचे हेडमास्तर नाटेकर यांच्यावर निलंबित करणे सस्पेंड करणे अशी जुजबी कारवाई न करता मयत मुलीचे कुटुंब भेंडे यांना 50 लाखाची मदत द्या भेंडे कुटुंबाला न्याय न मिळाल्यास चिकोडी जिल्हा रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि भेंडे कुटुंबाला न्याय देईल असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार दादा यांनी दिला 

       राजू पवार यांच्यासमवेत रयत संघटनेचे कारदगा झेडपी अध्यक्ष बबन जामदार, मानकापूर चे रयत संघटनेचे सदस्य रमेश मोरे, धोंडेवाडी गावातील धडाडीचे कार्यकर्ते एकनाथ सादळकर, विशाल बेनाडे ,राहुल पाटील ,राकेश जनवाडे, वैभव कांबळे, सौरभ सदर ,पिंटू बेनाडे, सुरज जाधव आधी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष