शिरोळ तालुक्यात भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'हर घर तिरंगा' अभियान यशस्वी करावे : अनिलराव यादव

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे या गौरवशाली पर्वानिमित्त भारत सरकारकडून “आझादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम देशभरात  राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शिरोळ तालुक्यात भाजपा पक्षाच्या वतीने 'हर घर पे तिरंगा' असा उपक्रम राबविण्यात येणार असून देशभक्ती जागविण्यासाठी कुटुंब प्रमुख व संस्थाचालकांनी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट  या कालावधीत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन भाजपाचे तालुका नेते अनिलराव यादव यांनी केले आहे.

            शिरोळ येथील सप्तर्षी निवासस्थान येथे शनिवारी तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री यादव बोलत होते, 

     भाजपा नेते यादव म्हणाले, देश पातळीवर शासनाच्यावतीने 'हर घर पे तिरंगा' हे अभियान १३ ते १५ ऑगस्ट  या कालावधीत राबविण्यात येणार आहे , या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावातील घरावर राष्ट्रध्वज फडकला पाहिजे, त्यासाठी राष्ट्रीय ध्वज उपलब्ध करून भाजपा कार्यकर्त्यांनी हे अभियान यशस्वी केले पाहिजे, शासन आदेशानुसार  घर, आस्थापना, संस्था कार्यालयाची इमारत यावर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम उत्साहात साजरा करावा.

        या बैठकीत शिरोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी उमेदवारी बाबत इच्छा व्यक्त केली, तर काही  कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी निश्चित करावी , या उमेदवारीबाबत भाजपा नेते अनिलराव यादव यांनी भाजपा पक्षाचा जो आदेश देतील तो मान्य करू असे भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले , त्यावेळी भाजपा नेते अनिलराव यादव यांनी भाजपा वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीबाबतचे धोरण स्पष्ट होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी असे त्यांनी सांगितले,

      या बैठकीस हेरवाड चे  सरपंच सुरगोंडा पाटील, राजापूरचे सरपंच संजय पाटील, मौजे आगरचे  माजी सरपंच  सुरेश पाटील, प्रधानमंत्री जनकल्याण योजनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, नवजीत पाटील , रामेश्वरी कांबळे, कुशाल कांबळे  ,जहांगीर शेख, महावीर वडगावे ,अरुण पाटील ,श्री आमले ,जाफर पटेल यांच्यासह  तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष