देवपुष्प सेमी इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये ग्रीन डे साजरा

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

निसर्ग सर्वांचा दाता आहे हे सर्वसामान्यांना समजण्यासाठी हेरवाड येथील देवपुष्य सेमी इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन डे साजरा करून निसर्गाची हानी करू नका, असा संदेश सर्वांना दिला आहे.

यावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,  स्वार्थासाठी आपण वन्यप्राण्यांची घरे उद्ध्वस्त करीत आहोत वृक्षतोडीमुळे निसर्गाला ही हानी पोहचत आहे. ज्याचा परिणाम अतिवृष्टी, भूकंप, अश्या अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. म्हणून आपणच भविष्याची पिढी म्हणून ही जबाबदारी उचलावी असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी हिरवा गणवेश तसेच झाडे लावा झाडे वाचवा चा संदेश फलकाव्दारे दिला. यावेळी स्कूलमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष