लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने बालोद्यानमध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
अब्दुललाट / शिवार न्यूज नेटवर्क :
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने अब्दुललाट येथील बालोद्यानमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कपडे, खाऊ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी या अगोदरही विविध सामाजिक उपक्रमात अग्रभागी असते. समाजातील गरजू वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देऊन लायन्स क्लबच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून अब्दुललाट येथील बालोद्यानमधील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कपडे, खाऊ तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन महेंद्र बालर यांच्या सर्व सदस्यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना सदरच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे सेक्रेटरी लायन सुभाष तोष्णीवाल, खजिनदार लायन संदीप सुतार , महेश कंदोई व लायन कृष्णा भराडीया, लायन नंदू बांगड, लायन सचिन येलेजा, लायन शैलेंद्र जैन, लायन मिलिंद बिरादार व लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा