दि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर"च्या नूतन चेअरमनपदी श्री.अर्जुन दिनकर पाटील तर व्हा.चेअरमनपदी सौ.पद्मजा तानाजी मेढे मॅडम यांची निवड


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

          १३ वर्षानंतर सत्तांतर होवून राजर्षि शाहू स्वाभिमानी आघाडीने 'एक झलक -१७ सलग' उद्दिष्ट पार करून १७ संचालक निवडून आले होते. पॅनेलची निर्मिती करतानाच ५ वर्षातील चेअरमन,व्हा. चेअरमन निवड सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली करायचे ठरले होते. बहुचर्चित चेअरमन पदी प्रथम संधी कोणाला मिळणार? अशी जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागले होते. अपेक्षाप्रमाणे चेअरमनपदी शिक्षक समितीचे श्री.अर्जुन पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला प्रतिनिधी सौ. पद्मजा तानाजी मेढे यांची निवड झाली. चेअरमनपदासाठी सूचक श्री.सुनिल हरिबा एडके व अनुमोदक श्री.बाळासाहेब निंबाळकर हे होते. तर व्हाईस चेअरमनपदासाठी सूचक सौ. वर्षा शरद केनवडे व अनुमोदक श्री.राजेंद्र पाटील होते. जिल्हा उपनिबंधक श्री. अमर शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या निवडी संपन्न झाल्या. सुकाणू समितीचे सदस्य,संघटनांचे पदाधिकारी,नेतेमंडळी व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडीनंतर समर्थकांनी अभिनंदन करुन एकच जल्लोष केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष