बोरगाव येथील खंडोबा मंदिराचे जीर्णोद्धार व तलावाचे सुशोभीकरण रखडलेच...!

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बोरगाव शहरातील पुरातन मंदिर असलेले श्री खंडोबा देवस्थान हे बोरगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सन 1952 साली अधिकृत नोंदणी असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्याचबरोबर मंदिरासमोर असलेला ऐतिहासिक तलावाचे सुशोभीकरण व्हावे यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आले .मात्र आज अखेरही या मंदिराचे जिर्णोद्धार झाले नाही .तसेच तलावाचे सुशोभीकरण ही झाले नाही. त्यामुळे भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे .या कामाकडे भागाचे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप भाविकांमधून होत आहे.

             सुमारे पाच एकर आवारात विस्तारलेल्या श्री खंडोबा मंदिराजवळ श्री भानाबाई ,गणेश ,विष्णू मंदिर आहेत. प्रत्येक वर्षी श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते,हजारो भाविक या यात्रेस उपस्थित राहतात .भाविकातून आलेल्या देणगीतून आजपर्यंत मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आलेले आहे. ऐतिहासिक मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा ,मंदिराभोवती कंपाऊंड व्हावे ,बोरवेल मधून पाण्याची व्यवस्था व्हावी ,जलकुंभ बसवावे ,विद्युत खांब बरोबरच लाईटची व्यवस्था व्हावी ,खंडोबा तलावाचे सुशोभीकरण व्हावे ,तलावातील गाळ काढावे ,यास बरोबर अनेक मागणी करण्यात आली आहेत .त्याचप्रमाणे मंदिर परिसरात उद्यान निर्माण करावे यासाठीही मागणी करण्यात आलेली आहे .मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे .भागाचे आमदार धर्मादाय खात्याच्या मंत्री आहेत. त्यांच्याकडेही मंदिर जीर्णदरबाबत मागणी करण्यात आली होती .मात्र अद्यापही या मंदिरास निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे भक्त वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .



सुमारे शंभर वर्षांपूर्वी असलेला या खंडोबा तलावातला एक वेगळे महत्त्व आहे. या तलावाचे ही सुशोभीकरण होणे गरजेचे आहे .तलाव भरणी किंवा तलाव सुशोभीकरणास वेगळे असे निधी मंजूर करण्यात येतो मात्र अद्यापही या कामास सुशोभीकरणाला ही निधी मंजूर झालेला नाही.

या ठिकाणी विद्युत खांबा बरोबरच विजेची व्यवस्था करण्यासाठी इस्टिमेट मंजूर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र अद्यापही या कामात सुरुवात झालेली नाही. नगरपंचायतीच्या बजेटमध्ये या तलावासाठी विशेष असा निधी उपलब्ध करावा अशी मागणी ही करण्यात आली होती .मात्र यंदाच्या बजेटमध्ये कोणतीच निधी या तलावासाठी राखीव ठेवण्यात आलेली नाही. हजारो भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा ही मागणी केल्या अनेक दशकापासून करण्यात येत आहे .मात्र लोकप्रतिनिधी सह शहरातील नेते पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष झाला आहे असे भक्तांकडून सांगण्यात येत आहे .तरी संबंधितांनी याकडे जातीने लक्ष देऊन मंदिराचे जिर्णोद्धार व तलावाची सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करावा अशी ही मागणी करण्यात येत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष