सहकार प्रशिक्षण निदेशकांची दत्त कारखान्याला सदिच्छा भेट
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केलेल्या कामाची घेतली माहिती
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे अंतर्गत 13 जिल्ह्यातील सहकार प्रशिक्षण निदेशक सहकार शिक्षणाधिकारी यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळला निरीक्षण दौऱ्यानिमित्त सदिच्छा भेट घेतली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून सुरु असलेला क्षारपड मुक्त शेतीचा उपक्रम, सेंद्रिय शेतीचे फायदे, जमिनीची पोत वाढवून एकरी २०० टन ऊस उत्पादनाची माहिती पटवून दिली. यावेळी पत्रकार दगडू माने यांनी स्व.सा.रे.पाटील यांच्या कार्यकाळापासून ते आज चेअरमन गणपतराव पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती दिली.
यावेळी राज्य सहकारी संघाचे मुख्याधिकारी एस. एस. बोडके, मंगल भोईर, एस. एस. डेहरे व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे या शिखर संस्थेचे महाराष्ट्रात 13 प्रशिक्षण केंद्र व तेथील जिल्हा सहकारी बोर्ड कार्यरत आहेत या सहकाराच्या प्रशिक्षण देणाऱ्या शिखर संस्थेचे सर्व प्रशिक्षक सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, लातूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद या सर्व जिल्ह्यातील प्रशिक्षक उपस्थित होते. राज्य सहकारी संघ ही महाराष्ट्रातील प्रशिक्षण देणारी शिखर संस्था आहे. या संस्थेचे सर्व प्रशिक्षक अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर तळागाळातील विकास सेवा सोसायटी ते सहकारी साखर कारखाना यातील सर्व अधिकारी पदाधिकारी संचालक कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत असतात महाराष्ट्र सहकारी संस्थाच्या अनुषंगाने सहकारातील प्रशिक्षण देणारी ही एकमेव संस्था आहे की जी संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर सहकाराचे प्रशिक्षण देण्याचे काम करते. यावेळी सहकारी संघाचे सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा