सदलगा ते पंढरपूर आषाढी वारी निमित्त वारकरी भाविकांचे प्रस्थान

 


अजित कांबळे / शिरोळ न्यूज नेटवर्क : 

  सदलगा येथुन प्रतिवर्षाप्रमाणे श्री.क्षेत्र पंढरपूर ते सदलगा येथून श्री.विठ्ठल रखुमाई दर्शनासाठी वारकरी प्रस्थान... यावेळी बोलताना सदलगा शहरातील जेष्ट वारकरी श्री.लक्ष्मण अमृतसम्मण्णवर म्हणाले की मि गेली पन्नास वर्षे झाली ही आषाढी वारी करतो..आज कित्येक वर्षे झाली आम्ही सर्व वारकरी भावीक न चुकता प्रतिवर्षी जातो..श्री विठ्ठलाच्या दर्शनाने,आनंद तसेच समाधान मिळते.मि आजपर्यंत 10 वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारीत तसेच सदलगा ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा 12 वर्षे झाली आम्ही सर्व वारकरी जात असतो.. यावेळी श्री.लक्ष्मण अमृतसम्मण्णवर,श्री.शंकर अंकले,श्री.कुबेर तांदळे,आनंद शितोळे , अशोक हळीजोळ, सदाशिव कागे, अप्पु अंकले,भिमराव वडगोले ,अण्णाप्पा अंकले ,मारुती भत्ते,मंजु गावडे,सुभाष परीट, अजित गावडे, संजय अंकले या वारीत सहभागी होवून पंढरपूर ला रवाना झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष