जयसिंगपूर येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार मेळावा
निष्ठा रॅलीच्या स्वागताबरोबर मेळाव्याल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा : अरुणभाई दुधवडकर यांचे आवाहन
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क
युवासेनाप्रमुख माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची निष्ठा रॅली २ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथील विक्रमसिंह राजे क्रीडांगणावर येत आहे. या रॅलीच्या स्वागत व आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी संपूर्ण शिरोळ तालुका सज्ज झाला आहे. या ठिकाणी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक महिला पदाधिकारी तसेच ठाकरे कुटुंबीय प्रेम करणार्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
जयसिंगपूर येथील सनसिटी सभागृहामध्ये पत्रकार बैठक आयोजित केली होती या वेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते. यावेळी बोलताना दुधवडकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाची संघटात्मक पुनर्बांधणी करण्याच्या उद्देशाने संपूर्ण राज्यभर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची शिवसेना निष्ठा रॅली व प्रमुख ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.याच पाश्र्वभूमीवर कोल्हापूर नंतर जयसिंगपूरमध्ये हा मेळावा संपन्न होत असल्याची माहिती दिली. स्वागत ज्येष्ठ शिवसैनिक अण्णासाहेब बिलोरे यांनी केले. या वेळी तालुकाप्रमुख वैभव उगळे, माजी नगरसेवक पराग पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मंगल चव्हाण उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, युवासेनेचे प्रतीक धनावडे नीलेश तवंदकर माजी तालुकाप्रमुख सतीश मलमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रॅलीमध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार विनायक राऊत पश्चिम महाराष्ट्र संपर्कनेते दिवाकर रावते कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्यासह सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. तरी या मेळाव्यास शिरोळ तालुक्यासह परिसरातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला पदाधिकाऱ्यानी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे . असे आवाहन केले आहे. या बैठकीस सर्व तालुक्यांतून शिवसैनिक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार जयसिंगपूर शिवसेना शहरप्रमुख तेजस कुराडे- देशमुख यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा