दत्तवाड परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी

इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क

आज देशभरात बकरी ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. मुस्लिम धर्मात बकरी ईद सणाला खूप महत्त्व आहे. या सणाला ईद-उल-अजहा किंवा बलिदानाचा सण असेही म्हणतात. रमजानच्या पवित्र महिन्याच्या ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते. आज दत्तवाड परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

दत्तवाड येथील जामा मशिदीत व बिलाल मशिदीत नमाज अदा करण्यात आली. या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून विश्वशांतीसाठी व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव एकत्र जमले होते. ईदच्या नमाज नंतर उपस्थित समाज बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार अनिल चव्हाण व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष